धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग महा-भरती 2026 | GNM, ANM, फार्मासिस्ट आणि इतर पदे
नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही वैद्यकीय किंवा आरोग्य क्षेत्रात नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम बातमी आहे. धुळे महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामध्ये विविध संवर्गातील पदांवर नवीन कंत्राटी भरती (Contractual Basis) जाहीर करण्यात आली आहे. या लेखामध्ये आपण या भरतीविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
महत्त्वाच्या तारखा आणि माहिती:
- अर्ज सुरु होण्याची तारीख: 02 मार्च 2026
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 मार्च 2026 (सायंकाळी 5:45 वाजेपर्यंत)
- अर्ज पद्धत: ऑफलाईन (Offline) - स्वतः जाऊन किंवा स्पीड पोस्टाद्वारे
- नोकरीचे स्वरूप: कंत्राटी पद्धत (11 महिने / 6 महिने करार)
- अधिकृत वेबसाईट: dhulecorporation.org
पदांचा तपशील आणि मानधन (Vacancy & Salary Details)
| पदाचे नाव | एकूण पदे | मासिक मानधन (रु.) |
|---|---|---|
| औषध निर्माता (Pharmacist) | 05 | ₹23,485/- |
| प्रयोगशाळा तज्ञ (Lab Expert) | 03 | ₹23,485/- |
| सार्वजनिक आरोग्य परिचारिका | 03 | ₹23,485/- |
| परिचारिका (Staff Nurse) | 07 | ₹23,485/- |
| लॅब असिस्टंट (Lab Assistant) | 02 | ₹22,485/- |
| एएनएम (ANM) | 01 | ₹22,485/- |
| अन्ननिरीक्षक (Food Inspector) | 01 | - |
| ड्रेसर (Dresser) | 03 | - |
| दाई (Midwife) | 10 | ₹20,985/- |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)
- औषध निर्माता: फार्मसी पदवीधर असणे आवश्यक.
- प्रयोगशाळा तज्ञ: रसायन/जीवशास्त्र/सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी आणि DMLT उत्तीर्ण.
- सार्वजनिक आरोग्य परिचारिका: 12वी विज्ञान उत्तीर्ण + GNM पदविका + पब्लिक हेल्थ प्रमाणपत्र + MNC नोंदणी.
- परिचारिका (Staff Nurse): GNM पदविका आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल (MNC) नोंदणी.
- ANM: मान्यताप्राप्त ANM कोर्स आणि रिन्यूअल रजिस्ट्रेशन.
- लॅब असिस्टंट: DMLT पदविका आणि नोंदणी.
- ड्रेसर: माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण आणि ड्रेसर कोर्स.
- दाई: 7वी उत्तीर्ण, 1 वर्ष दाई कोर्स (वय मर्यादा ३१ वर्षांपर्यंत).
वयाची अट (Age Limit)
उमेदवाराचे वय नियुक्तीच्या वेळी:
- खुल्या प्रवर्गासाठी (Open Category): जास्तीत जास्त 38 वर्षे.
- राखीव प्रवर्गासाठी (Reserved Category): जास्तीत जास्त 43 वर्षे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
- विहित नमुन्यातील अर्ज आणि त्यावर पासपोर्ट साईझ फोटो.
- आधार कार्ड
- महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- जन्मतारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
- कास्ट सर्टिफिकेट (आरक्षित प्रवर्गासाठी)
- शैक्षणिक कागदपत्रे आणि अनुभवाचे प्रमाणपत्र (असल्यास)
अर्ज कसा करावा?
ही भरती ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. उमेदवारांनी आपला परिपूर्ण भरलेला अर्ज व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती धुळे महानगरपालिकेच्या कार्यालयात १३ मार्च २०२६ सायंकाळी ५:४५ च्या आत स्वतः जाऊन किंवा स्पीड पोस्टने जमा करायचे आहेत. वेळेनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
सविस्तर माहितीसाठी आणि अर्जाचा नमुना पाहण्यासाठी खालील आमचा व्हिडीओ नक्की पहा!
🎥 संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पहा📲 अर्जाची PDF मिळवण्यासाठी Telegram जॉईन करा
टिप्पणी पोस्ट करा